Our Services

फेसबुक लाईव्ह, मुलाखत, लेख, कंन्टेन्ट डेव्हलप, व्हिडिओ शुट, फोटो शुट, डाक्युमेन्ट्रीन शुट, जाहिराती, प्रशिक्षण, कार्यशाळा, सोशल आणि डिजिटल मार्केटिंग.

Social Media LIVE

कृषी पर्यटन केंद्राचे चालक अथवा मालकाची मुलाखत, कृषी पर्यटन केंद्रात फेसबुक लाईव्ह, काही पर्यटकांचा अनुभव पण फेसबुक लाईव्ह करतो. कृषी पर्यटन केंद्राचेही फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबवर लाईव्ह करतो. आणि पर्यटकांशी अपडेट राहणे.

INTERVIEW

कृषी पर्यटन विश्वची टीम, प्रत्यक्ष कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन केंद्र चालकाची मुलाखत घेणार. पर्यटकांची मुलाखत घेणार. ही मुलाखत आमच्या युट्युब आणि पुणे मेट्रो या वाहिनी वर तसेच छापील स्वरूपाची देणार आहे.

VIDEOGRAPHY

संपूर्ण कृषी पर्यटन केंद्राचे शूट. डोळ्यांना सुखावणारं दृश. प्राणी आणि पक्षांची रेलचेल, सकाळ आणि संधाकाळचे विहंगम दृश्य कॅमेरात कैद. शेती आणि ग्रामीण संस्कृती प्रतिबिंब दाखवणार. छान डाक्यूमेंट शूट.

film & DOCUMENTARY

पर्यटक आणि केंद्र चालक यांची मुलाखत. संपूर्ण कृषी पर्यटन केंद्राची शुट. यात स्क्रिप्ट, विवो, ग्राफिक्स, इफेक्ट काही फोटो, लोगो, पदनाम, संगीत आणि इतर माहिती समावेश असेल. परिसराची माहिती. शुटची उत्तम दर्जा असेल.

PHOTOGRAPHY

पर्यटक, पर्यटन केंदात येण्याचे एक कारण म्हणजे त्या केंदाचे सुंदर छायाचित्र होय. निसर्ग सौंदर्य, नदी, डोंगर, वनस्पती, फळं, फुलं, प्रसंग आणि पर्यटाकंचे आनंदाचे क्षण टिपणार. कृषी पर्यटन केंद्रात वेगवेगळ्या कारणांसाठी येतात. फोटोंच्या स्वरुपात आठवणींना उजाळा मिळते. सोशल मीडियावर पोस्ट करणारे सुंदर फोटो आणि डिजाईन देतो.

ADVERTISING

कृषी पर्यटन विषयी बातम्या आणि जाहिराती संबंधी लेखन करतो. स्थानिक वृत्तपत्रे, नियतकालिका, ई-जनरल वृत्तवाहिन्या, रेडीओ, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया वर मार्केटिंग, प्रमोशन, संदेश (S.M.S) करतो. ई-मेल मार्केटिंग करतो. कृषी पर्यटन केंद्राचे ब्रँन्डींग करतो. जाहिरातीच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्र आणि पर्यटकांशी प्रभावीपणे संवाद साधतो.

Digital MARKETING

आजचा युग हा सोशल मीडियाचा युग आहे. वाट्सअँप, फेसबुक, लिंकडइन, इन्स्टाग्राम, युट्युब, टि्टर, आणि इतर समाजमाध्यमांवर कृषी पर्यटन केंद्रांचे सुंदर फोटो, लेख, व्हिडिओ अपलोड आणि लाईव्ह करतो. न्यूज पोर्टल, आँनलाईन न्यूज, इ-माध्यमातून आँनलाईन मार्केटिंग करतो.

WORKSHOP

दर तीन महिन्याला M.T.D.C, पराशर कृषी पर्यटन आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पर्यटन कार्यशाळा घेतो. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन केंद्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कृषी पर्यटन संकल्पने पासुन केंद्र उभारणी आणि मार्केटिंग पर्यंतचे सर्व सहकार्य करतो.

Book Now & Get Best Discount in Your Favorite Agri Tourism Center

About us

अॅग्रो टुरिझम विश्वच का ?

भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतीला जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन केंद्र नावारूपाला येत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कृषी पर्यटनाला जास्त महत्व येत आहे. कृषी पर्यटन ही चळवळ महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू झाली. याचाच भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कृषी पर्यटन ही संकल्पना पोहचविण्याच्या उद्धेशाने आम्ही अँग्रो टुरिझम विश्व हे संकेतस्थळ सुरू केली आहे. कृषी पर्यटन विश्वच्या वतीने महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाचे अभ्यासदौरे आणि कृषी पर्यटन सहलीचे तसेच कृषिविषयक पर्यटन केंद्राची माहिती आणि संबंधित केंद्र चालकांची मुलाखत, लेख, छायाचित्रे आणि इतर महत्वाची माहिती आपल्या agrotourismvishwa.com या संकेतस्थळावर पहायला मिळेल. शेतक-यांनी कृषी पर्यटन केंद्र कसे सुरू करावे, ते उत्तम कसे चालवावेत, कृषी पर्यटन उद्योग म्हणून कसे उभारता येईल. मार्केटिंग आणि जाहिराती कोण-कोणत्या पद्धतीने आणि कसे करू शकतो. नव-माध्यमांचा वापर करून आपला व्यवसाय कसे वाढवायचा. व्यवसायात येणा-या अडचणींना सामना कसा करावा. तसेच शासकीय धोरणे, कृषी पर्यटन संबंधी काम करणारी व्यक्ती, संस्था, संघटना, कार्यशाळेची माहिती तसेच कृषी पर्यटन केंद्रांची यशोगाथा या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. १६ मे जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्ताने अँग्रो टुरिझम विश्व या संकेतस्थळची निर्मित्ती करून महाराष्ट्रासह भारतातील शेतक-यांना ही साईट अर्पण करत आहोत. संकेतस्थळच्या माध्यमातून शेती न परवडणा-या शेतक-यांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतीचे उत्पन्न दुप्पट वाढविण्यासाठी कशाप्रकारे मदत करता येईल. या पर्यटनाच्या माध्यमातून गावाला आणि शेतक-यांना पैसा आणि प्रतिष्ठा कसा मिळवून देता येईल. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन कसे करतील. गावातच रोजगार निर्मिती, शेतकरी आर्थिकदृष्या समृद्ध होण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र किती महत्वाचे आहे. हे आम्ही या संकेतस्थळच्या माध्यामातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

  • 2

  • 09

  • 18

  • 25

YOURS TEAM

Behind every successful events

Some Beautiful Clicks

What are you waiting for Call us & Get best Deal
+91 8888 559 886

Blogs