कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे शेतावर जाऊन राहणे, फिरणे, ग्रामीण संस्कृतीची ओळख करून घेणे, आणि ग्रामीण आदरातिथ्य स्वीकारत मिळालेल्या नवीन ऊर्जेमुळे पुन्हा शहरी रहाटगाडय़ाच्या जीवनास तोंड देण्यास सिद्ध होते.
माणूस हजारो वर्षापासून शेती करतो आहे आणि चिखलाशी त्याची नाळ जन्मजन्मांतरीची. कितीही काचेच्या चकचकीत ऑफिसमध्ये राहून कॉम्प्युटरच्या जंजाळात तो काम करू लागला तरी त्याला मोकळ्या हवेचे आणि या चिखलाचे अप्रूप नेहमीच राहणार. नेमकी हीच गरज कृषी पर्यटन पूर्ण करते. पर्यटकाला गावाच्या वातावरणाची जाणीव देऊन, त्याला शेतीच्या हिरवळीने थंड करून दोन तीन दिवसांचा न विसरता येणारा अनुभव दिलात की तो पर्यटक पुन्हा तुमच्याकडे येणारच आणि आपल्या मित्रांनाही घेऊन येईल. तुमच्याकडे गावाला जाऊन काही करण्याची इच्छा असेल तर कृषी पर्यटन तुम्हाला एक उत्तम पर्याय बहाल करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *