पुण्यातील प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र

पावसाळा आला की, हौशी पर्यटकांसाठी सुगीचे दिवस असतात. पावसाळ्यात अनेक ठिकाणी फिरण्यासाठी जातात. कोणी ट्रेकिंग करतात, कोणी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. काही पर्यटक किल्ले पर्यटन करतात तर, कोणी हिल स्टेशनचे सफर करतात. हे सगळं कमी जास्त प्रमाणात आपण सर्व जण करतोच. पुणे जिल्ह्यात असे काही कृषी पर्यटन केंद्र आहेत. जिथे तुम्हाला कृषी व ग्रामीण संस्कृतीचे संगम पाहायला मिळते. नेमकं कृषी पर्यटन केंद्र म्हणजे काय आहे.

कृषी पर्यटन म्हणजे काय ?
आपण आपली शेती संस्कृती विसरत आहोत. गावाशी असलेलं नाळ तुटत आहे. याच शेती संस्कृतीशी पुन्हा जवळ जाणे. गावाचे गाव पण अनुभवण्याठी शहरातील पर्यटकांसाठी खास ठिकाण म्हणजे कृषी पर्यटन केंद्र होय. प्रत्यक्षात शेती कशी केली जाते. शेतात कोणते पीक कधी आणि कसे घेतले जाते. शेतात कोण-कोणती पीके कोणत्या ऋतुत येतात. एकंदरीत ग्रामीण भागातील शेती विषयक सर्व उपक्रम शेतात कसे राबवले जातात. ते प्रत्यक्षात शेतात जाऊन ते पाहणे, अनुभवणे, स्वत: शेतात काम करणे. अस्सल गावचं जेवणाचा अस्वाद घेणे. हे सगळं सुविधा नाममात्र शुल्कात कृषी पर्यटन केंद्रात उपलब्ध होते. ग्रामीण जीवनाचा अनुभूती जिथे शहरी पर्यटक घेऊ शकतात त्या ठिकाणाला कृषी पर्यटन म्हणतात.

पराशर कृषी पर्यटन केंद्र, राजुरी
पराशर कृषी पर्यटन केंद्र, पुण्यापासून 90 कि. मी च्या आसपास जुन्नर तालुक्यातील राजूरी गावा जवळ आहे. येथे राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आहे. पण खाण्यासाठी फक्त शुद्ध शाकाहरी जेवण मिळते. पराशर कृषी पर्यटन केंद्रात प्रवेश केल्यानंतर एखाद्या गुरूकुला मध्ये आगमन केल्याचा भास होतो. अगदी एतिहासिक काळातील कुटीचे दर्शन होते. या गुरूकुलामध्ये कृषी विषयीचे ज्ञान मनोज हडवळे यांच्याकडून सहज मिळतो. पराशर ऋषी आणि जुन्नर तालुक्याचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर एकदा पराशरला नक्की भेट द्या. या कृषी पर्यटन केंद्राचे युएसपी म्हणजे मनोज हडवळे याचे कृषी संस्कृतीशी असलेलं घठ्ठ नातं आणि त्यांच्याकडे असलेलं कृषीचे ज्ञान होय.

निसर्गाच्या सानिध्यात निवांत विद्यार्थी

 

    शालेय विद्यार्थांना शेती आणि गाव संकृती सांगताना केंद्र, संचालक मनोज हडवळे


आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र, गोळेगाव

खवय्यांसाठी प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र म्हणजे आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र होय. खाण्यासाठी दूर-दूरून पर्यटक येतात. इथे शाकाहरी आणि मासांहरी घरगूती जेवण मिळते. आलेल्या पर्यटक पाहुण्यांना पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते. आमत्रण कृषी पर्यटन केंद्रात पंचगव्याचे विविध उत्पादने मोठ्या प्रामाणात घेतले जाते. मसाल्यांचा निर्मितीही केली जाते. पंचगव्य उत्पादने म्हणजे काय?, त्याचे फायदे कोण-कोणते आहेत. आयुर्वेदिक औषधीही येथे उपलब्ध आहेत. थोडक्यात काय तर खाण्याचे आणि आयुर्वेदिक औषधीची वेगवेळे प्रयोग येथे खायला आणि पाहायला मिळतात. केंद्रप्रमुख शशिकांत जाधव स्वता: पंचगव्य उत्पादने तयार करतात. पंचगव्याचे प्रचार व प्रसार करतात.

आमंत्रण कृषी पर्यटन केंद्रात पारंपरिक पद्धतीने स्वागत करताना.

अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र, शिंळिंब, मावळ
पुण्यापासून 50-55 कि. मी अंतरावर अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र आहे. दहा एकरामध्ये हे कृषी पर्यटन केंद्र आहे. परिसरातील रांजन-खळगे, केंद्राच्या बाजूला नदी वाहते. कृषी पर्यटनाच्या चारही बाजूने डोंगराने व्यापला आहे. 2-3 कि. मी अंतरावर देवराई आहे. जवळंच 8 -10 कि. मी अंतरावर पवना धरण आहे. शिवार फेरी आणि वेगवेगळे छोटे- मोठे कौटुंबिक कार्यक्रम येथे घेऊ शकता. मावळ तालुक्यात पावसाळ्यात इंद्रायणीचे भात लावणी मोठ्या प्रामाणात केले जाते. अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रात शुद्ध शाकाहरी आणि मांसाहरी ग्रामीण चवीचे जेवण मिळते. राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. एका वेळी 50-60 पर्यटक राहू शकतात. मावळ प्रांत हा निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेला भाग. कृषी पर्यटन केंद्रात फक्त शेती आणि गावाचे दर्शन घडत नाही. तर इथल्या पर्यावरणाचा पर्यायाने स्थानिक इतिहास भूगोलाचीही माहिती मिळते.

शहरी पर्यटक भात लावणीचा आनंद घेताना

 

अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रात अस्सल गावरान जेवन

तिकोना कृषी कृषी पर्यटन केंद्र काशिंग, मुळशी  
मुळशी तालुक्यातील हडशी जवळील काशिंग येथे सुरेश मराठे यांनी तिकोणा पिकनिक या नावाने कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. तिकोणा कृषी पर्यटन केंद्र सह्याद्रीच्या कुशीत आणि ऐतिहासिक तिकोणा किल्याच्या पायथ्याशी वसलेला आहे. पर्यटकांसाठी उत्तम व्यवस्था आणि सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मार्ट या संस्थेमार्फत उत्तम “महाराष्ट्र कृषी पर्यटन पुरस्कर 2019” देऊन गौरविण्यात आले. ट्रेकिंग, भातलावणी, वृक्षरोपण, बैलगाडी सफर, जवळ असलेल्या तलावात बोटिंग, रूचकर जेवण आणि इतर तुमच्या आवडीच्या पारंपरिक खेळ येथे खेळायला मिळेल. त्या त्या ऋतुत आंबे त्यात हापुस, केसर, पायरी, तोतापुरी या जाती तसेच नारळ, चिकू, पेरू, आवळा लिंबू, संत्री अशी फळझाडे आणि अनेक प्रकारची शेकडो फुलझाडे, देशी वृक्ष, लॉन, आणि उत्कृष्ट प्रकारचं गार्डन, गवत आणि कौलारू झोपड्यांचा अनुभव आपण आपल्या परिवारसोबत येथे घेऊ शकतो. हे कृषी पर्यटन केंद्र पुण्यापासून फक्त 40 कि. मी अंतरावर आहे.

तलावाच्या काठी सुंदर असे तिकोना कृषी पर्यटन केंद्र

 

 

 

विदेशी पर्यटकांना पारंपरिक पद्धतीने स्वागत करताना केंद्र संचालक सुरेश मराठे

 

सुप्रिया थोरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *