About Us

भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतीला जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन केंद्र नावारूपाला येत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कृषी पर्यटनाला जास्त महत्व येत आहे. कृषी पर्यटन ही चळवळ महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू झाली. याचाच भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कृषी पर्यटन ही संकल्पना पोहचविण्याच्या उद्धेशाने आम्ही अँग्रो टुरिझम विश्व हे संकेतस्थळ सुरू केली आहे. कृषी पर्यटन विश्वच्या वतीने महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाचे अभ्यासदौरे आणि कृषी पर्यटन सहलीचे तसेच कृषिविषयक पर्यटन केंद्राची माहिती आणि संबंधित केंद्र चालकांची मुलाखत, लेख, छायाचित्रे आणि इतर महत्वाची माहिती आपल्या agrotourismvishwa.com या संकेतस्थळावर पहायला मिळेल.

शेतक-यांनी कृषी पर्यटन केंद्र कसे सुरू करावे, ते उत्तम कसे चालवावेत, कृषी पर्यटन उद्योग म्हणून कसे उभारता येईल. मार्केटिंग आणि जाहिराती कोण-कोणत्या पद्धतीने आणि कसे करू शकतो. नव-माध्यमांचा वापर करून आपला व्यवसाय कसे वाढवायचा. व्यवसायात येणा-या अडचणींना सामना कसा करावा. तसेच शासकीय धोरणे, कृषी पर्यटन संबंधी काम करणारी व्यक्ती, संस्था, संघटना, कार्यशाळेची माहिती तसेच कृषी पर्यटन केंद्रांची यशोगाथा या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

१६ मे जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्ताने अँग्रो टुरिझम विश्व या संकेतस्थळची निर्मित्ती करून महाराष्ट्रासह भारतातील शेतक-यांना ही साईट अर्पण करत आहोत. संकेतस्थळच्या माध्यमातून शेती न परवडणा-या शेतक-यांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतीचे उत्पन्न दुप्पट वाढविण्यासाठी कशाप्रकारे मदत करता येईल.

या पर्यटनाच्या माध्यमातून गावाला आणि शेतक-यांना पैसा आणि प्रतिष्ठा कसा मिळवून देता येईल.  कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन कसे करतील. गावातच रोजगार निर्मिती, शेतकरी आर्थिकदृष्या समृद्ध होण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र किती महत्वाचे आहे. हे आम्ही या संकेतस्थळच्या माध्यामातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गणेश चप्पलवार (Founder CEO)

गणेश चप्पलवार, पहिली ते पदव्युत्तर पर्यंतच शिक्षण नांदेड, लातुर आणि पुण्यात झालं. मी पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षणही याच विभागात पूर्ण केला.

मुबंई मध्ये News 18 lokmat लोकमत या वृत्तवाहिनीत आणि पुण्यातील दै. प्रभात मध्येही प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम केले आहे. पुण्यातील पुणे मेट्रो या वृत्तवाहिनीमध्ये वृत्तनिवेदक आणि रिपोर्टर म्हणून काम करत आहे. तसेच बंगळुरू येथील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या Tiny step या कंपनीमध्ये अनुवादक (Translator) म्हणून कामाचा अनुभव आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात अध्यापन सहाय्यक म्हणून 2018-2019 मध्ये काम पाहिले आहे.