Spread the love

About Us

महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्राची भेटी-गाठी, मुलाखत, चर्चा, लेखन, आणि अभ्यास.

-महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रांचे संपर्क -माध्यम आणि डिजिटल माध्यांमावर प्रभाव.

-समाजमाध्यमांवर प्रभूत्व, योग्य वापर, कृषी पर्यटन केंद्रांसाठी नियोजनपूर्व प्रचार आणि प्रसार.

-जाहिराती, मार्केटिंग आणि जनसंपर्क क्षेत्राचा ज्ञान.

-ग्रामीण व शहरी संस्कृतीचा अनुभव. –

-अनुभवी पत्रकारांची टीम

 

भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतीला जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन केंद्र नावारूपाला येत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कृषी पर्यटनाला जास्त महत्व येत आहे. कृषी पर्यटन ही चळवळ महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू झाली. याचाच भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कृषी पर्यटन ही संकल्पना पोहचविण्याच्या उद्धेशाने आम्ही अँग्रो टुरिझम विश्व हे संकेतस्थळ सुरू केली आहे. कृषी पर्यटन विश्वच्या वतीने महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाचे अभ्यासदौरे आणि कृषी पर्यटन सहलीचे तसेच कृषिविषयक पर्यटन केंद्राची माहिती आणि संबंधित केंद्र चालकांची मुलाखत, लेख, छायाचित्रे आणि इतर महत्वाची माहिती आपल्या agrotourismvishwa.com या संकेतस्थळावर पहायला मिळेल. महाराष्ट्रातील सर्व कृषी पर्यटन केंद्रांना डिजिटल आणि आँनलाईन उपलब्ध करून देण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून Agro tourism vishwa करत आहे.

शेतक-यांनी कृषी पर्यटन केंद्र कसे सुरू करावे, ते उत्तम कसे चालवावेत, कृषी पर्यटन उद्योग म्हणून कसे उभारता येईल. मार्केटिंग आणि जाहिराती कोण-कोणत्या पद्धतीने आणि कसे करू शकतो. नव-माध्यमांचा वापर करून आपला व्यवसाय कसे वाढवायचा. व्यवसायात येणा-या अडचणींना सामना कसा करावा. तसेच शासकीय धोरणे, कृषी पर्यटन संबंधी काम करणारी व्यक्ती, संस्था, संघटना, कार्यशाळेची माहिती तसेच कृषी पर्यटन केंद्रांची यशोगाथा या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

१६ मे जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्ताने अँग्रो टुरिझम विश्व या संकेतस्थळची निर्मित्ती करून महाराष्ट्रासह भारतातील शेतक-यांना ही साईट अर्पण करत आहोत. संकेतस्थळच्या माध्यमातून शेती न परवडणा-या शेतक-यांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतीचे उत्पन्न दुप्पट वाढविण्यासाठी कशाप्रकारे मदत करता येईल.

या पर्यटनाच्या माध्यमातून गावाला आणि शेतक-यांना पैसा आणि प्रतिष्ठा कसा मिळवून देता येईल.  कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन कसे करतील. गावातच रोजगार निर्मिती, शेतकरी आर्थिकदृष्या समृद्ध होण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र किती महत्वाचे आहे. हे आम्ही या संकेतस्थळच्या माध्यामातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

 

Ganesh Chappalwar (Founder & CEO)

नमस्कार, माझ्या विषयी थोडक्यात, पहिली ते पदव्युत्तर पर्यंतचा शिक्षण नांदेड, लातुर आणि पुण्यात झालं. पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा अनुभव आहे. अनेेक Digital Media आणि Social media च्या कार्यशाळेत सहभागी घेतले आहे. कृषी पर्यटन कार्यशाळेत शेतकऱ्यांना Digital आणि Social मीडियाचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. पत्रकारितेचा शिक्षण घेतल्यामुळे Print Media, T.V, Radio आणि Digital media अनुभव आहे. जाहिराती, जनसंपर्क, मुलाखत, ब्लाँग, लेख, व्हिडिओ शूट, कन्टेन्ट डेव्हलप आणि डिजिटल मार्केटिंगचा प्रत्यक्षिक अनुभव आहे.

मुबंई येथील News 18 lokmat या वृत्तवाहिनीत आणि पुण्यातील दै. प्रभात मध्येही प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम केले आहे. पुण्यातील पुणे मेट्रो या वृत्तवाहिनीमध्ये वृत्तनिवेदक/Anchor, पत्रकार/ Reporter म्हणून काम करत आहे. तसेच बंगळुरू येथील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या @Tiny step या कंपनीमध्ये अनुवादक (Translator) म्हणून कामाचा अनुभव आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागा (DoMCJ) त अध्यापन सहाय्यक म्हणून 2018-2019 मध्ये काम पाहिले आहे. याच विभागात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले.

पुरस्कार : 

* अर्थसंकेतच्या वतीने दिला जाणारा बेस्ट ई-काँमर्स स्टार्टअप आँफ द ईअर 2018 पुरस्काराने agro tourism vishwa चा सन्मान.

* महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C) आणि पर्यटन संचालनालय (DoT) पुणे यांच्या वतीने पर्यटन मित्र पुरस्काराने गौरव.

* मराठवाडा जनविकास संस्थेच्यावतीने मराठवाडा महासन्मान सोहळा 2018 मध्ये विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.