कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन !

Spread the love & Awareness

कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन !

Agro tourism is a sustainable tourism !

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन केंद्र आणि परिसरातील डोंगर- दऱ्यां, पर्यटन स्थळ, नैसर्गिक ठिकाणे, सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक संपदेचे जतन करणे, जैवविविधतेचे संवर्धन स्थानिक लोक, संस्कृती, बोली-भाषा, खाण-पान, वेषभूषा इत्यादीचे जतन कृषी पर्यटनाच्या माध्यामातून कसे होणार आहे ते आपण पाहूया…

कृषी पर्यटन केंद्रात जतन केलेल्या ग्रामीण वस्तू.

कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण शाश्वत ठेवू शकतो. यात रानभाज्या, गुणकारी औषधी, वनस्पती, फुले, फळे या शेती आणि ग्रामीण संस्कृतीची ओळख असणाऱ्यां गोष्टी महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्रात पारंपरिक काही गोष्टी जपले जातात. खलबत्ता वरवंटा, जातं, मुसळ, रवि, ऊकळं,  नागरण, पाळी, धुंड, तीपण, मुगसं, चाबूक, कासरा (दोरी) यासारखे अनेक घटक शेती संबंधीत वस्तू  भविष्यात फक्त संग्रालयात बघू शकू.

https://agrotourismvishwa.com/important-of-elements-of-agri-tourism/

 

रानभाज्या तांदळग्या (चवळई), कुंद्रे, कुरूडू, तरवडे, पात्र्या, करट खूसुंबा, शापू, राजगिरा, आंबाडा, आघाडा, आंबुशी, चंदन बटवा (चिल), वसू, काठेमाठ, मोहोर (चाई/ चावी), भारंगी या आणि इतर अनेक वेगवेगळ्या भागीतल अनेक रानभाज्या या प्रामुख्याने आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात उगवतात. या भाज्या पावसाळ्यात स्वत:हून उगवतात. या भाज्यांची कोणी लागवड करता ना इतर भाज्यांसारखी काळजी घेतली जाते.  या भाज्या उगवले पाहिजे, वापरले पाहिजे, त्यांचं संवर्धन केले पाहिजे. या भाज्यांची माहिती उपयोग, वापरा विषयीचे ज्ञानाचे संक्रमण होणे गरजेचं आहे. ही दुर्मिळ माहिती फक्त कृषी पर्यटन केंद्राद्वारे जतन आणि संवर्धन करू शकतो यांचे अनेक उदाहरण महाराष्ट्रात आहेत. कृषी पर्यटनाची संकल्पना ही शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासावर आधारित संकल्पना आहे.

कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरातील रानभाज्या.

आजकाल पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी शाश्वत पर्यटन हा एक पर्यावरण संवर्धनाचा नवीन पर्याय विकसित होत आहे. शाश्वत पर्यटनामुळे पर्यावरणाची काळजी तर घेतली जातेच शिवाय रोजगारनिर्मितीलाही हातभार लागतो. शाश्वत पर्यटन म्हणजे कोणत्याही ठिकाणी पर्यटनाला गेल्यानंतर आपल्या वर्तवणुकीचा कोणताही दुष्परिणाम त्या ठिकाणच्या पर्यावरणावर  होणार नाही, तिथलं पर्यावरण शाश्वत राहील, याची काळजी घेणं शाश्वत पर्यटनासाठी कृषी पर्यटन हा एक उत्तम मार्ग आहे.

कृषी पर्यटन केंद्रात मिळणारे ग्रामीण पद्धतीचे जेवण.

शहरी ग्राहक आणि ग्रामीण शेतकरी यांना जोडणारा कृषी पर्यटन हा शेतीस पूरक एक चांगला व्यवसाय आहे.  या व्यवसायातून  रोजगाराच्या अनेक संधी दडल्या आहेत त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत  होऊ शकते. ग्रामीण वस्तूंना  बाजारपेठ उपलब्ध होते तसेच शहरी लोकांना ग्रामीण संस्कृती व पर्यावरणाची नव्याने ओळख होते. कृषी पर्यटनाचा व्यवसाय जनजागृतीही करू लागला आहे.  त्यातून पर्यटकांना पर्यावरणाविषयीही आपलया जबाबदारीची जाणीव होते. शांत, निवांत आणि ग्रामीण जीवन जवळून अनुभवण्याची संधी देणारे  कृषी पर्यटन हे जैवविविधता,  संस्कृती, पर्यावरण संवर्धनास  हातभार लावते आहे.

लेखिका : मनिषा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + 16 =