पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा

Spread the love & Awareness

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राज्यातील कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि ‘कृषी पर्यटन विश्व’ यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ही कार्यशाळा हाँटेल गंधर्व, वरच्या मजल्यावर असलेल्या सभागृहात, बालगंधर्व रंगमंदिर समोर, काँग्रेस भवन रोड, पुणे येथे दिनांक 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2019 रोजी होणार आहे. ‘कृषी पर्यटन विश्व’ चे संस्थापक गणेश चप्पलवार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन वृद्धीसाठी कृषी पर्यटन विश्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय कार्यशाळेत कृषी पर्यटन संकल्पना, केंद्र उभारणी, व्यवस्थापन, कृषी पर्यटनाचे भविष्य आणि संधी, प्रकल्प आराखडा आणि जाहिराती, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया या महत्वाच्या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेसाठी सशुल्क नोंदणी 18 नोव्हेंबरच्या आधी करणे आवश्यक आहे. ही कार्यशाळा दिनांक 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2019 पुणे येथे होणार आहे. इच्छूक शेतकरी व इतर व्यावसायिक मंडळींना, कृषी पर्यटन संकल्पना समजावी. कृषी पर्यटनाची संकल्पना तसेच कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठीचे लागणारी माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. नव्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना या कार्यशाळेचा उपयोग नक्कीच होईल. असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या वतीने सांगण्यात आले.

या कार्यशाळेत सुप्रिया करमरकर, (उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे), दिपक हरणे (प्रादेशिक व्यवस्थाप, एम.टी.डी.सी, पुणे), मनोज हाडवळे, (पराशर कृषी पर्यटन), राहुल जगताप (अंजनवेल कृषी पर्यटन), बसंवंत विठाबाई बाबाराव (पर्यावरण शिक्षण केंद्र), व्यंकटेश्वर कल्याणकर (माध्यम अभ्यासक) अमोल वायभट (सी. ए.) गणेश चप्पलवार (कृषी पर्यटन विश्व) आदी मार्गदर्शन करणार आहेत.

अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 8888559886 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + seven =