कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020

Spread the love & Awareness

कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020 I Agro Tourism Policy 2020 I  कृषी पर्यटन धोरण आणि मान्यता I पर्यटन व कृषी विभाग


६ सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली आहे. गेले दोन दशकापासून कृषी पर्यटनाच्या स्वतंत्र धोरणासाठी अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तींनी सरकारकडे पाठपूरावा केला होता. यात कृषी पर्यटन विकास संस्था, (ATDC), महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (MART), जुन्नर पर्यटन विकास संस्था, राज्यातील इतर पर्यटन क्षेत्रात काम करणारे संस्था आणि काही व्यक्ती कृषी पर्यटनाचे धोरणासाठी पाठपूरावा व प्रयत्न केले होते. याच्यांसह शासनाचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन संचालनालयाने अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यात कृषी पर्यटनाचे प्रचार व प्रसार करण्याचे काम कृषी पर्यटन विश्व (Agro Tourism Vishwa) गेली 2017 वर्षापासून करत आहे. राज्य शासनाला कृषी पर्यटन धोरणाला मंजूरी द्यायला विलंब लागला असला तरी देर है दुरूस्त है असाचं म्हणावं लागेल. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2020 च्या पावसाळी अधिवेशनात कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली आहे. 

शहरी पर्यटक भात लावणीचा आनंद घेताना


कृषी पर्यटन धोरणाचे उद्देश काय. 

What is the purpose of agri tourism policy.

 • पर्यटकांना शेतीचा आणि गावाचा आनंद देणे.
 • शेती व्यवसायाला चालना देणे. 
 • कृषी पर्यटनातून गावाचा विकास करणे.
 • शेती उत्पादनांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
 • शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध देणे.
 • कृषी पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे.
 • पर्यावरण पूरक व अनुकूल पर्यटनाचा अनुभव देणे.
 • शेतकऱ्यांसाठी पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे.
 • गावातील महिला व होतकरू तरूणांना रोजगाराची संधी देणे.
 • ग्रामीण संस्कृती, लोककला आणि परंपरेचा दर्शन घडवणे.
 • पर्यटकांना शेती कामाचे अनुभव देणे.
 • पर्यटकांना प्रदूषण विरहीत पर्यटन घडवणे.
 • निसर्गाच्या सानिध्याचा अनुभव देणे. 
 • कृषी व ग्रामीण संस्कृतीला चालना देणे.
 • कृषी पर्यटनाचा अनुभवात्मक आनंद देणे.
 • महाराष्ट्र कृषी व ग्रामीण पर्यटन समिती स्थापना करणे.
 • गावातील पडीक व गायरान जमीन वापरात आणणे.
 • नैसर्गिक वातावरणात फिरणे. – 
पर्यटकांना राहण्याची व्यवस्था
 • कृषी पर्यटन केंद्र कोण उभारू शकतात. 
 • Who can set up agri-tourism centers.
 • शेतकरी 
 •  शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था
 • राज्यातील कृषी विज्ञान केंद्र
 • कृषी महाविद्यालये
 • कृषी विद्यापीठे
 • शेतकऱ्यांच्या भागीदारी संस्था
 • कोणतीही कंपनी 
 • सेंद्रिय शेती करणारा शेतकरी
 • कोणतेही शेतीपूरक व्यवसाय करणारा शेतकरी 

कृषी पर्यटन धोरणाचे इतर फायदे अथवा लाभ 

Other benefits of agri-tourism policy

 • प्रादेशिक उपसंचालक, पर्यटन विभागाकडे अर्ज (नवी-मुबंई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती आणि रत्नागिरी)
 • http://www.maharashtratourism.gov.in/  या वेबसाईटवर अर्ज करू शकता.
 • पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र 
 • दोन ते पाच एकर शेती असावे
 • निवासाची व्यवस्था करणे
 • भोजन व स्वयंपाक घराची व्यवस्था 
 • प्रथम नोंदणी  शुल्क २५००
 • नूतनीकरण शुल्क दर पाच वर्षांनी १००० रुपये 
 • शेतकऱ्यांना बँक कर्ज उपलब्ध
 • विद्यूत वितरणात सुट- जी. एस. टीत सवलत

 • Team Agro Tourism Vishwa
 • https://www.youtube.com/watch?v=xbIRcJ1iqOo&t=1s

4 thoughts on “कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 17 =