मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…

Spread the love & Awareness

कृषी पर्यटन संकल्पना (Agro tourism concept)

मागील काही वर्षापासून शेतातील उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावाची अस्थिरता, शेतातील कामगारांची कमतरता, यामुळे तरुण पिढी तर शेती बाबत निरुत्साही आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवू लागला. अशा परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळे यांनी 1987 मध्ये सगुना बाग नावाने देशातील पहिले कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. आणि अनेक शेतकऱ्यांना हा कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. म्हणून आज श्री चंद्रकांत भडसावळे यांना भारताच्या कृषी पर्यटनाचे जनक म्हणून संबोधतात. 

https://agrotourismvishwa.com/marketing-and-planning-of-agro-tourism-center/

शहरातील पर्यटकांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन राहणे आणि शेतकऱ्यांनी आपल्या खेड्यातील फलत्या फूलत्या शेतावरच आयोजित केलेली आनंददायी शिक्षण प्रक्रिया आणि मौजमजा यांचा मिलाफ म्हणजे कृषी पर्यटन होय. शेतकऱ्यांच्या सशुल्क पाहुणचार हेच कृषी पर्यटन होय. कृषी आधारित शेतकऱ्यांचा प्रतिष्ठा व आर्थिक पाठबळ देणारा उद्योग. 

हिरवळीने नटलेले पर्यटन केंद्र

कृषी पर्यटनातील शिखर

संस्था मार्ट महाराष्ट्रातील कृषी पर्यटन संकल्पनेला खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी या कामात सुसूत्रता आणण्यासाठी 12 डिसेंबर 2008 रोजी म्हणजे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवशी बारामती येथे म्हणजेच महाराष्ट्र राज्य व कृषी ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाची माननीय सौ सुनेत्रा वहिनी पवार यांनी स्थापना केली. संस्थेच्या मुख्य उद्देश शेतकरी कार्यकर्ते विचारवंत यांना एकाच छत्राखाली आणून ही चळवळ राज्यातील कानाकोपर्‍यात पोहोचवू नये. हा उद्देश कृषी पर्यटन व्यवसायात संघटित स्वरूप मार्टमुळे प्राप्त झाले. 

https://agrotourismvishwa.com/marketing-and-planning-of-agro-tourism-center/

दहा वर्षात गगनभरारी

मागील दहा वर्षाचा आढावा घेतला तर संस्थेच्या प्रथम तीन वर्षे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार या अध्यक्ष होत्या फेब्रुवारी 2010 मध्ये दिल्ली येथे केंद्र सरकारच्या असोचेम संस्थेने ग्रीन इंडिया राष्ट्रीय परिषद भरविली त्यावेळी कृषी पर्यटन हा विषय होता या परिषदेमध्ये मारणे सहभाग घेऊन राज्याचे कृषी पर्यटन राष्ट्रीय स्तरावर पोहचविले विविध वृत्तपत्रे सोशल मीडिया माध्यमातून कृषी पर्यटन संकल्पना शहरी पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे राज्यातील विविध जिल्ह्यात कृषी पर्यटन परिषदेचे आयोजन करून या व्यवसायासंदर्भात जनजागृती केली पर्यटन शेती पूरक व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायाबाबत तांत्रिक शिक्षण देण्यासाठी मारणे एक दिवशीय व चार दिवशीय कृषी पर्यटन शिबिर आयोजित केले शाळा महाविद्यालय आयोजित केले त्यामुळे आज राज्यात 525 कृषी पर्यटन केंद्रे कृषी पर्यटनाच्या विविध पुरवीत आहेत आणि आज संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा असे आपला महाराष्ट्र हे कृषी व ग्रामीण पर्यटनाचा क्षेत्रातील देशातला आघाडीचं राज्य आहे कृषी पर्यटन केंद्रे रोजगार निर्मितीचे केंद्र बांधले आहेत. आज कृषी व ग्रामीण पर्यटन मध्ये राज्याचे 20 कोटीच्या आसपास उलाढाल आहे हा मार्च सर्वे आहे राज्यातील जवळपास 30 तालुक्यात मार्च मार्च वर्ग सभासद म्हणजे तालुकास्तरीय कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत कृषी पर्यटन व्यवसाय नवीन असल्याने या व्यवसायात समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत विशेष केंद्र उभारणी करताना होणारे बांधकाम आणि ग्रामपंचायती तहसीलदाराच्या शेतकऱ्यांना बांधकाम बाबत नोटीस देणे शेतकऱ्यांना सेवा व्यवसाय व करमणूक कराचा नोटिसा येत असे कृषी पर्यटन केंद्र म्हणजे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना त्रास देऊ लागला.

कृषी पर्यटन केंद्रात खेळाचा आनंद लुटताना विद्यार्थी

कृषी पर्यटन धोरण (Agro tourism policy)

कृषी पर्यटनाचा होणाऱ्या समस्या या मार्ट मागील दहा वर्षात राज्य सरकारकडे मांडल्या. यामध्ये राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन कृषी व पर्यटन विभागात आदेश देऊन कृषी व ग्रामीण पर्यटन व्यवसायाला चालना देणारे कृषी पर्यटन धोरण 2014 मसुदा तयार केला. दुर्देवाने या मसुद्यात अद्यापही मंजुरी मिळणे बाकी आहे. हे धोरण सरकारी दरबारी मंजूर करून घेणे त्यासाठी मार्चपर्यंत प्रयत्नशील आहे. 

https://agrotourismvishwa.com/agro-tourism-is-a-place-of-study/

16 मे जागतिक कृषी पर्यटन दिवस

मागील दहा वर्षांपासून संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक संघटनेच्या मान्यतेने 16 मे हा दिवस कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी कृषी व ग्रामीण पर्यटनाचा कार्य करणाऱ्या संस्था पर्यावरण संवर्धन कृषी संस्कृती वृद्धिंगत करणारे शाश्वत पर्यटन सेंद्रिय शेती इत्यादी निकषांचा विचार करून महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्राची निवड करून त्यांना या दिवशी कृषी पर्यटन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते व्यासपीठावर अनेक शेतकऱ्यांचा त्यांच्या यशोगाथा सादरीकरण करून कौतुकाची थाप त्यांचे पाठीवर मिळाले आहे आज कृषी पर्यटन ही चळवळ महामार्ग च्या माध्यमातून खेड्यापाड्यात पोहोचली आहे अनेक युवक-युवती पदवीधर शेतकरी कृषी पर्यटनामुळे पुन्हा शेतीकडे वळत आहेत ही शेतीसाठी आशादायी चित्र वातावरण आहे सरकारने या व्यवसायासाठी कृषी पर्यटनाला कायदेशीर मंजुरी द्यावी हीच शेतकऱ्यांची मागणी आहे कृषी पर्यटनात शेतकऱ्यांना आत्मसन्मान व प्रतिष्ठा निर्माण करण्याचे काम मारणे मागील दहा वर्षात केला आहे राज्यात पाच हजार कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा मराठी दशकपूर्तीनिमित्त संकल्प केला आहे. यासाठी सरकार आणि आपणा सर्वांचे पाठबळ व सहकार्य अपेक्षित आहे.

बाळासाहेब बराटे 

अध्यक्ष मार्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + 14 =