कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक

Spread the love & Awareness

जगाच्या पाठीवर कुठेही कृषी पर्यटन केंद्र उभे करायचं असेल तर तुमच्याकडे खालील घटक असणे गरजेचे आहे. गाव, शेती, शेतकरी आणि पर्यटक हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. या शिवाय कृषी पर्यटन अपूर्ण आहे. या महत्वाच्या घटकाविषयी आपण आज माहिती घेऊयात.

गाव :

शेती आणि शेतकरी इतकाच गाव ही अत्यंत महत्वाचा घटक आहे. जसे माणसांमुळे घराला घरपण येते तसेच शेतीला गावामुळे शेतीपण येते. गावातले लोकचं शेतात राबतात. शेतीचे राखण गावातील शेतकरीच करतात. शेतमजूर, बैलगाडी चालवणे, नांगरणी, ट्रक्टर चालवणे, जनावरांची काळजी घेणे. दूध काढणे, शेण काढणे, घरारात जाणून दूध वाढणे. किंवा दूध जमा एकत्र करणे, पर्यटकांना गावातील लोकांची राहणीमान, पेहराव, गावातील घरं, खाद्य संस्कृती, बोली-भाषा, परंपरा, श्रद्धा, आदिवासी गाव असेल तर संपूर्ण अदिवासी गावाची संस्कृती समजूण सांगणे  हे गावामुळेचं शक्य आहे. गावात शहरातून पर्यटक येतात. गावातील लोकं आणि पर्यटक यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संवाद होत असते. यातून गावाला शहराचा आणि शहराला गावचा आकर्षण निर्माण होते. कृषी पर्यटनामुळे भारत आणि इंडियाची ओळख होते. म्हणून कृषी पर्यटनात गावाला लय महत्व आहे.

 शेती :

 शेती हा कृषी पर्यटनाचा आत्मा आहे. शेती शिवाय कृषी पर्यटनाला काहीही महत्व नाही. कृषी पर्यटन हा प्रामुख्याने शेतीवर आधारित सध्या तरी पूरक व्यवसाय आहे. नंतर या शेती पूरक व्यवसायाचे रूपांतर मोठया व्यवसायात होणार यात काही शंका नाही. जे कोणी कृषी पर्यटन सुरू करण्याचा विचार करत असेल तर त्यांनी शेतीला पहिले प्राध्यान्य देणे गरजेचे आहे. शेती हे कृषी  पर्यटनाचे महत्वाचे घटक आहे. शहरातून आलेल्या पर्यटकांना शिवार फेरीच्या माध्यमातून शेती, पिके,  पिकांचे प्रकार, फळे, भाजीपाला, शेतात बी किंवा रोप लावण्यापासून ते खाण्याच्या ताटात येई पर्यंतची प्रक्रिया सांगणे. शक्य असल्यास शेतीचा इतिहास आणि शेतीचे बदलते स्वरूप शाळेतील विद्यार्थ्यांना सांगीतल्याने शेती आणि शेतक-यांविषयी आपुलकी निर्माण होते. म्हणून शेती हा घटक अत्यंत महत्वाचे आहे.

शेतकरी :  

कृषी पर्यटन हा व्यवसाय शेतक-यांसाठी आहे. अनुभवी शेतकरी उत्तम कृषी पर्यटन केंद्र चालवू शकतो. अस्सल शेतकरीच चांगल्या पद्धतीने पाहूणचार करू शकतो. म्हणून शेतकरी हा शेती आणि पर्यटक यांच्यातील दुवा आहे. शेतकरी आपली शेती संपत्ती अभिमानाने आलेल्या पर्यटकांना दाखवतो. शहरातील लोकांचे जसे  आठवड्याच्या, महिन्याचा आणि वर्षाचा नियोजन असते तसेच शेतक-यांचे पिकांविषयी पेरणी, लावणी, खुरपणी, कापणी/काढनी, मळणी या विषयीचे नियोजन असते.  त्यानूसार शेतकरी बाराही महिने 365 दिवस शेतात राबतो. शेतकरीचं शेतीचे तज्ञ आहेत. आणि तो कृषी पर्यटानाचा महत्वाचा घटक आहे.

 पर्यटक :  

कृषी पर्यटन हा व्यवसाय शहरातील पर्यटकांसाठी आहे. शहरातील प्रदुषण, गाड्यांचा आवाज, गोंगाट आवाज, घडाळ्याच्या काट्यावर चालणारं जीवन या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात, बदलते शहरी संस्कृती कधी कधी नको वाटते. कुठे तरी निवांत निसर्गाच्या खुशीत जाऊन शांत नितांत रमून जावे असे सर्वाना वाटतेच की, पण या इमारतीच्या जंगलात कुछे आणि कोणाकडे जावे असा प्रश्न पडतो. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर कृषी पर्यटन असा आहे. सुट्टीच्या दिवशी, आठवड्याच्या शेवटी एक-दोन दिवस आपल्या कुटुंबा सोबत, मित्रांसोबत किंवा आँफिसच्या लोकांसोबत आपण कृषी पर्यनटनाच्या माध्यमातून निसर्गात मनमूराद आनंद घेऊ शकतो. कृषी पर्यटनात पर्यटक हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. याच पर्यटकांमुळे आपल्या कृषी पर्यटन केंद्राची माहिती समाज माध्यमांमुळे सर्वत्र पोहणचते. आलेले पर्यटक कृषी पर्यटन केंद्रातील अनेक फोटो काढतात आणि सगळीकडे पोस्ट करतात. आर्थिक आणि मार्केटिंगच्या दृष्टीने पर्यटक हा घटक खूप महत्वाचा आहे.

गाव, शेती, शेतकरी या महत्वाच्या घटकासह कामगार, स्वागत कक्ष, खोली, स्वयंपाक घर, राहण्यासाठी व्यवस्था, फिरण्यासाठी वाहण, कृषी पर्यटनाचे नियोजन व व्यवस्थापन,  परिसराची माहिती सांगण्यासाठी गाईड आणि आर्थिक बाजूही खूप गरजेचे आहे. या आणि इतर  गोष्टी कृषी पर्यटन केंद्रासाठी अत्यंत मह्त्वाचे घटक आहेत.

टीम : agro tourism vishwa.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 14 =