कृषी पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग आणि नियोजन

Spread the love & Awareness

कृषी पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग आणि नियोजन

Marketing and planning of agro tourism center

कृषी पर्यटन ही पर्यटनाची नवीन संकल्पना असून तिचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी पर्यटन हा एक फायद्याचा कृषिपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून अधिक आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी केवळ कृषी पर्यटन केंद्र बांधून उपयोगाचे नाही तर त्याचा प्रसार व प्रचार करणेही तितकेच आवश्यक आहे. शेतकरी कृषी पर्यटन केंद्र बांधताना मोठा खर्च करतात मात्र मार्केटिंग करताना कमी पडतात. योग्य मार्केटिंग आणि जाहिराती न केल्यामुळे पर्यटकांपर्यंत केंद्राची माहिती पोहचतच नाही. यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्रचालकांनी कृषी पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग आणि नियोजन केले पाहिजे. आजच्या लेखामध्ये आपण कृषी पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग आणि नियोजन कसे करावे माहिती घेणार आहोत.

कृषी पर्यटन केंद्राचा परिसर

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ, जाहिराती, प्रमोशन, टूर एजन्सी टायअप, टूर एजंट आणि डिजिटल माध्यम हे कृषी पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग करण्याचे मुख्य साधन आहेत. या माध्यमांचा वापर करून केंद्रचालक अधिकाधिक पर्यटकांपर्यंत आपल्या केंद्राची माहिती पोहचवू शकतो. जाणून घ्या या माध्यमांचा वापर कसा करावा याविषयी –

प्रिंट माध्यम (print mediun for agro and rural tourism)

केंद्रचालकाने आपल्या कृषी पर्यटन केंद्राविषयी वर्तमानपत्र किंवा मासिकातून आकर्षक जाहिरात द्यावी, पॅम्प्लेट बनवावे. हे पॅम्प्लेट शहरातील वर्तमानपत्र विक्रेत्याकडे वाटपासाठी द्यावेत. कृषी पर्यटन केंद्राचे वैशिष्ट्ये, वेगळेपण याविषयी जाहिरातीमध्ये माहिती द्यावी. तसेच सुट्ट्यांच्या दरम्यान पर्यटकांसाठी खास सवलत जाहीर करावी. वर्तमान पत्र आणि मासिकांतून कृषी पर्यटनाविषयी जागृती करणारे लेख लिहावेत.

https://agrotourismvishwa.com/who-and-how-start-agri-rural-and-farm-tourism/

इलेक्ट्रॉनिक माध्यम (Electronic medium for agro and rural tourism)

टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातूनही कृषी पर्यटन केंद्राविषयी माहिती दिली जाऊ शकते. पण हा थोडा खर्चिक प्रकार आहे आणि याचा कालावधीही मर्यदित असतो. टीव्ही आणि रेडिओवर कृषीविषयक कार्यक्रम घेतले जातात या कार्यक्रमांमध्ये केंद्रचालकाने भाग घ्यावा.

जाहिराती (you are looking for advertising for agro Tourism)

आजच्या युगात जाहिरातीला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या सेवेला व उत्पादनाला मागणी निर्माण करण्यासाठी जाहिरातीचा वापर केला जातो. त्यामुळे वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके, रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाइल्स, इंटरनेट, डॉक्युमेंटरी, फ्लेक्स रंगीत फलक, माहितीपत्रके, हस्तपत्रके यांसारख्या माध्यमांचा वापर करून कृषी पर्यटन केंद्राची जाहिरात करावी. जाहिरातीमध्ये केंद्राचे वैशिष्ट्ये, कार्यक्रम, सवलती यांचा उल्लेख करावा.

 

 

टूर एजन्सी टायअप (you are looking for Tour agency tie-up for agro Tourism)

आजकाल पर्यटन क्षेत्राला सोन्याचे दिवस आल्याने टूर एजन्सी क्षेत्राची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्या कृषी पर्यटन केंद्रावर अधिक पर्यटक येण्यासाठी टूर एजन्सी टायअप करणे हाही एक उत्तम मार्ग आहे. टूर एजन्सी टायअप केल्याने त्यांच्या वेबसाईटवर ते कृषी पर्यटन केंद्राची जाहिरात करू शकतात, कृषी पर्यटन केंद्राविषयी पर्यटकांना माहिती देऊन भेट देण्यासाठी त्यांचे मन वळवू शकतात. तसेच आपल्या पर्यटन केंद्रावर सहली देखील आयोजित करू शकतात.

https://agrotourismvishwa.com/benefits-of-rural-and-agro-tourism/

टूर एजंट (you are looking for Tour agent for agro Tourism)

टूर एजंटकडे अनेक पर्यटक पर्यटन ठिकाणांच्या चौकशीसाठी येत असतात. टूर एजंटशी संपर्क ठेवल्यास ते आपल्या पर्यटनकेंद्राविषयी माहिती पर्यटकांना पुरवू शकतात. अशारितीने टूर एजंटमार्फत ही कृषी पर्यटक केंद्राला भेट द्यायला येऊ शकतील.

 

प्रमोशन (Promotion for agro and rural tourism)

कृषी पर्यटक केंद्राला प्रसिद्धी मिळावी म्हणून कृषि पर्यटन केंद्राचे प्रमोशन करावे. प्रमोशन अनेक पद्धतीने करता येईल. केंद्राविषयी माहिती दुसऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा वेबसाईटवर टाकून केंद्रांचे प्रमोशन करता येईल. तालुक्यात किंवा शहरात काही कार्यक्रम असतील तर त्याला स्पॉन्सर करावे. मात्र हा खर्चिक प्रकार आहे. कृषी पर्यटन केंद्रावर एखाद्या प्रसिद्द व्यक्तीला किंवा सेलेब्रेटीला बोलावून त्यांच्याकडून पर्यटन केंद्राचे प्रमोशन करू शकता. असे प्रमोशन करण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र डिजिटल मीडियाचा जर जास्तीतजास्त वापर करून प्रमोशन केले तर नक्कीच फायदेशिर आणि किफायतशीर पडेल.

डिजिटल माध्यम / समाज माध्यम (Digital medium /social media for agro and rural tourism)

सध्याचे युग हे डिजिटल आहे. सगळीकडे समाज माध्यमांचाच बोलबाला आहे. वेबसाईट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, व्हॉट्सॲप, टेलेग्राम, यूट्यूब यांसारखे विविध डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित झालेले आहेत. आजकाल अनेक लोक या डिजिटल माध्यमांचा वापर करतात, या माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले पर्यटन केंद्र पोहचण्याचा प्रयत्न करावा.

 

i) वेबसाईट  ((you are looking for Website for agro Tourism)

कृषी पर्यटन केंद्राच्या नावाने वेबसाईट सुरु करणे अतिआवश्यक आहे. ही वेबसाईट आकर्षक असावी. वेबसाईटवर पर्यटन केंद्राचा लोगो आणि बोधवाक्य असावे. वेबसाइटची मांडणी सुटसुटीत असावी. ज्यामध्ये पर्यटन केंद्राविषयी माहिती, लेख, फोटो आणि व्हिडिओ टाकावेत. केंद्राविषयी माहिती, विविध उपक्रम, पत्ता, संपर्क क्रमांक यांची माहिती द्यावी. पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करता येण्याची सोय वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावी. पर्यटकांना फीडबॅक देण्यासाठी वेबसाईटवर फीडबॅकचा कॉलम जरूर ठेवावा. जेणेकरून त्यावर पर्यटक आपला अनुभव सांगू शकतील. त्यावरुन इतर पर्यटक अधिक माहिती जाणून घेऊ शकतील.
याशिवाय कृषी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या इतर वेबसाईटशी संपर्क करून त्यांवर आपल्या पर्यटन केंद्राची जाहिरात किंवा माहितीची लिंक द्यावी आणि विशेष म्हणजे साईट नेहमी अपडेट ठेवावी.

https://agrotourismvishwa.com/rural-agro-tourism-and-holiday/

ii) फेसबुक  (facebook use for agro and rural tourism)

कृषी पर्यटन केंद्राच्या नावाने फेसबुक पेज बनवावे. वेबसाईट प्रमाणेच त्याची मांडणी करावी. त्यावर नवीन कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्याविषयी माहिती पेजवर टाकावी. लोकांना त्या कार्यक्रमासाठी ऑनलाइन इन्व्हिटेशन पाठवावेत. कृषी पर्यटन केंद्राचे तसेच केंद्रावर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह करावे. कृषी पर्यटन केंद्राचे फेसबुकच्या माध्यमातून प्रोमोशन करावे जेणेकरुन अधिक लोकांपर्यंत पोहचता येईल.

iii) ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन (Twitter, Instagram, LinkedIn for agro and rural tourism)

ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइनवर कृषी पर्यटन केंद्राचे खाते (Account) बनवावे. ट्विटरवरून केंद्र आणि केंद्रावर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची लिंक शेयर करावी. त्यासाठी योग्य ते हॅशटॅग वापरावेत. ट्विटरवरून कृषी पर्यटन केंद्राची जाहिरात करावी. इंस्टाग्रामवर कृषी पर्यटन केंद्राचे फोटो व व्हिडिओ पोस्ट करावेत. लिंक्डइनवर देखील माहिती, लेख, फोटो व व्हिडिओ टाकावेत.

iv ) व्हॉट्सॲप , टेलिग्राम (WhatsApp, Telegram use for  agro and rural tourism)

व्हॉट्सॲप, टेलिग्रामवर कृषी पर्यटन केंद्राचा ग्रुप बनवावा. त्यावर नवनवीन लेख, माहिती, कार्यक्रम, जाहिराती यांची अद्ययावत माहिती नेहमी टाकावी.

v ) यूट्यूब (YouTube channel for agro and rural tourism)

पर्यटन केंद्राविषयी माहिती देणारा यूट्यूब चॅनेल सुरु करावा. यावर केंद्राविषयी माहितीचे, केंद्राच्या परिसराचे, केंद्रावर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे, पर्यटकांच्या मुलाखती,  तज्ञांच्या मुलाखती यांचे व्हिडिओ बनवून टाकावेत. या व्हिडिओची लिंक फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, व्हॉट्सॲप, टेलेग्रामवर शेयर करावी.

अशाप्रकारे डिजिटल माध्यमांद्वारे आपण केंद्राचे मार्केटिंग करून अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहचू शकतो.

 

ॲग्रो टुरिझम विश्व (Agro Tourism Vishwa for agro and rural tourism)

 

ॲग्रो टुरिझम विश्व ही आमची संस्था कृषी पर्यटन केंद्रांसाठी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.  मागील तीन वर्षांपासून पर्यटन केंद्र, शेतकरी आणि पर्यटक यांना जोडण्याचं ॲग्रो टुरिझम विश्व काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून कृषी पर्यटनाविषयी जागृती निर्माण व्हावी, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हक्काचं डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणं, कृषी पर्यटन केंद्रांचे मार्केटिंग आणि प्रमोशन करणे, कृषी पर्यटन केंद्रासाठी ट्रिप ऑर्गनाईज करून देणे आणि ज्या शेतकऱ्यांना पर्यटन केंद्र उभारायचं आहे त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्याच्यासाठी कार्यशाळा आयोजित करणं ही कामे ॲग्रो टुरिझम विश्व ही संस्था करते. ॲग्रो टुरिझम विश्व या वेबसाईटवर याविषयी माहिती मिळते.

 

                                                                                                                                                        लेखिका : सुप्रिया थोरात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + sixteen =