कृषी पर्यटन सहल

Spread the love & Awareness

कृषी पर्यटन सहल

Agri tourism trip

पावसाळ्यात निसर्ग आपल्या रंगाची मनसोक्त उधळण करत असतो. म्हणून अनेक लोक पावसाळ्यात फिरायला जायला पसंत देतात. बहुतांशी लोक ट्रेककिंगला पसंती देतात. आम्हाला मात्र अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर जाण्याची संधी मिळाली. लोकांना शेतीचे महत्व कळावे म्हणून अ‍ॅग्रो टुरिझम विश्वने अंजनवेल अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर सहल आयोजित केली होती.

कृषी पर्यटन आणि मावळ परिसराची माहिती सांगताना मा. नरेंद्र पितळे सर…

मावळ तालुक्याला डोंगर, दऱ्याखोऱ्या, धरणे, मंदिरे, लेणी यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेल्या मावळ तालुक्यात पुण्यापासून ७५ किलोमीटर असणाऱ्या ‘शिळिम्ब’ या गावात अंजनवेल अ‍ॅग्रो टुरिझम सेंटर आहे. सकाळी ९ वाजता पुण्यातील डेक्कनहून प्रवासाला सुरुवात झाली. रस्त्याने जाताना अनेक ठिकाणी भाताची खाचरे , छोटे धबधबे , तुडुंब भरलेले नाले दिसले. निसर्ग पाहत पाहत आम्ही ११ वाजता टुरिझम सेंटरवर पोहचलो. कोसळणारा पाऊस स्वागताला होतच. सेंटरवर पोहचल्या-पोहचल्या शिरा- पोहे आणि चहा असा खमंग नाश्ता मिळाला. सुट्टीचा वार असल्याने इतरही पर्यटकांची गर्दी होतीच. थोड्या विश्रांतीनंतर ग्रुपमधील सर्वजण सेंटरचा परिसर पाहण्यासाठी निघाले. विविध फुलझाडे , वनस्पती ह्या सेंटरच्या आवरत मोठ्या दिमाखाने पावसात उभ्या होत्या. सेंटरच्या मागच्या बाजूला भाताची शेती व पर्यटकांचा आकर्षण बिंदू असलेला छोटा धबधबा आहे. या धबधब्यात अगदी लहान मुलेही भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत होती. धबधब्याच्या वरच्या बाजूस निसर्गनिर्मित रांजण खळगे आहे. शेतीमध्ये विविध रानभाज्याही आहेत.

https://agrotourismvishwa.com/best-agri-tourism-in-pune/ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − 2 =