कृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक

Spread the love & Awareness

कृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक

The difference between agri-tourism and resort

काळानुसार पर्यटनाचे स्वरूप बदलत आहे. त्यानुसार मग पर्यटकांच्या फिरायला जाण्याच्या , राहण्याच्या गरजाही बदलत आहेत. पूर्वी फक्त हौशी पर्यटकच फिरायला जायचे. आता पर्यटनाच्या बाबतीत प्रत्येक जण जागरूक होत आहे. शहरी लोक एक दिवसीय पिकनिकला प्राधान्य द्यायचे किंवा मोठ्या पर्यटन ठिकाणी चार-पाच दिवस फिरून यायचे. आता फिरण्याची ही संकल्पना बदलली असून लांबचा प्रवास करून फिरायला जाण्यापेक्षा लोक शहराच्या जवळ असणाऱ्या पर्यटन केंद्रांवर जाऊन राहण्याला पसंती देऊ लागले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कृषी पर्यटन केंद्रांनी राहण्याचे आणि खाण्याचे जपलेले वेगळेपण. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आणि ग्रामीण जीवन अनुभवण्याचा आनंद काही औरच असतो. कोणत्याही सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये राहण्यापेक्षा कृषी पर्यटन केंद्रात राहण्याचा आनंद वेगळाच असतो. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत कृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक –

कृषी पर्यटन केंद्राची आकर्षक सजावट

रिसॉर्ट हे बहुतांशी शहरात पर्यटन केंद्राच्या ठिकाणी बांधलेले असतात. मौजमजा करण्यासाठी किंवा मोठ्या सुट्टीचा बेत आखणारे लोक रिसॉर्टला प्राधान्य देतात. येथे अत्याधुनिक खाण्यापिण्यासोबतच स्पा, स्विमिंग पूल, स्पोर्ट्स, मनोरंजन, शॉपींग अशा नानाप्रकारच्या आलिशान सुविधा पुरवल्या जातात. हॉटेल, कृषी पर्यटन केंद्र, रेस्टॉरंट, कॅन्टीन, धाबा यापेक्षा सर्वात सर्वात आलिशान आणि महागडा प्रकार आहे. यातून केवळ शहरी किंवा श्रीमंत लोकांच्याच विकासाला अधिक हातभार लागतो.

https://agrotourismvishwa.com/agro-tourism-is-integrated-project/

याउलट कृषी पर्यटन केंद्रावर जाऊन राहणे खूपच किफायतशीर आहे. निसर्गाशी आणि ग्रामीण जीवनाशी रममाण होण्याचा अनुभव कृषी पर्यटनाच्या माध्यामातून पर्यटकांना मिळतो. कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण जीवन , संस्कृती यांचे जतन केले जात आहे. पर्यटन केंद्रावर राहण्यासाठी बनवलेली घरे पर्यावरणपूरक असतात. यामध्ये बहुतांशी गवत, माती आणि शेणाने सारवलेली कुटी असते. अगदी उन्हाळ्यातही या ठिकाणी थंड वातावरण असते. काही ठिकाणी थोडीफार आधुनिक पद्धतीचाही राहण्याची व्यवस्था असते. पर्यटकांना त्यांच्या पसंतीनुसार राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. काही लोकांना तंबूमध्ये राहायचे असेल किंवा मचाणावर राहायचे असेल तर तीही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कृषी पर्यटन केंद्रांत राहण्याच्या ठिकाणी पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात निवांतपणाचा अनुभव घेता येतो.

  what is the agro and resort tourism कृषी व रिसोर्ट टुरिझम म्हणजे काय ?

शेतात नांगरणीचा अनुभव घेताना पर्यटक

रिसॉर्टमध्ये अनेक ठिकाणी आधुनिक गेम्स, स्विमिंग, क्लब आणि स्पोर्ट्स असे अनेक प्रकार असतात. याउलट कृषी पर्यटन केंद्रांमध्ये ग्रामीण पद्धतीच्या खेळांची माहिती दिली जाते ते खेळ खेळायला शिकवले जातात. उदा. विटीदांडू , लगोरी , मातीपासून विविध वस्तू बनविणे.

Agri-tourism is a very old business. कृषी पर्यटन खूप जुना व्यवसाय आहे. 

https://agrotourismvishwa.com/the-difference-between-agri-tourism-and-resort/

रिसॉर्टमध्येमध्ये आधुनिक पद्धतीचे किंवा फास्टफूड , इन्स्टंट फूड यांसारखे जेवण पुरवले जाते. तर कृषी पर्यटन केंद्रामध्ये अस्सल गावरान पद्धतीचे सकस जेवण दिले जाते. यामध्ये स्थानिक पदार्थ , भाकरी , विविध चटण्या यांचा समावेश असतो. रिसॉर्ट्स हे पर्यटनस्थळांच्या आजूबाजूला बांधलेले असतात तर कृषी पर्यटन केंद्रामध्येच पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. कृषी पर्यटन केंद्रामध्ये निसर्गाच्या सहवासात , पक्षांच्या किलबिलाट राहता येते.

ग्रामीण जीवनाचा अनुभव घेताना पर्यटक

https://agrotourismvishwa.com/agri-tourism-and-challenges-opportunities/

रिसॉर्ट्स हे केवळ आधुनिकतेचे प्रतीक आहेत. यामध्ये अधिक आर्थिक मोबदल्यात आधुनिक सोयीसुविधा पुरविल्या जातात. यामुळे केवळ शहरीकरणालाचं वाव भेटतो तर कृषी पर्यटन केंद्रांमध्ये कृषी आणि पर्यटन यांचा संगम पाहायला मिळतो. शहर व गाव यांना जोडण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र महत्वाचा दुवा ठरत आहेत. यामुळे गाव आणि शहर यांच्यातील दूरी कमी होत आहे. कृषी पर्यटन केंद्रामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त होतो व त्यामुळे सामुदायिक विकास देखील होतो. कमी खर्चामध्ये ग्रामीण जीवन व निसर्गाचे सानिध्य अनुभवण्यासाठी आणि गावच्या प्रगतीला अप्रत्यक्षपणे हातभार लावण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांना पर्यटकांनी अवश्य भेट देऊन पाहावी.

                                                                                                                                                           

                                                                                                                                                                  लेखिका : सुप्रिया थोरात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 1 =