कृषी पर्यटनाच्या महत्वाच्या दोन बाजू एक कृषीशिक्षण आणि कृषीरंजन

Spread the love & Awareness

कृषी पर्यटनाच्या महत्वाच्या दोन बाजू एक कृषीशिक्षण आणि कृषीरंजन

The two important aspects of agro tourism are agrieducation and agritainment

कृषिपर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला विविध प्रयोग करण्याची संधी मिळते आणि शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवन संस्कृती यांविषयी माहिती मिळते.  कृषी पर्यटन या शेतीपूरक व्यवसायामुळे कृषिशिक्षण आणि कृषिरंजन होते. जाणून घेऊयात कृषी पर्यटन कशाप्रकारे कृषीशिक्षण व कृषिरंजनास हातभार लावते.

शिवारात फेरफटका मारताना पर्यटक

कृषीशिक्षण (Agrieducation)

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. सुमारे 60 ते 65 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. मर्यदित शेती, नैसर्गिक आपत्ती आणि जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव यामुळे शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नाही. आजही अनेक भागात शेती मान्सूनवरच अवलंबून आहे. भारताच्या वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच कृषी उत्पन्न वाढणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी कृषी शिक्षणाबाबत जागृती निर्माण होणे आवश्यक आहे.

https://agrotourismvishwa.com/the-difference-between-agri-tourism-and-resort/

कृषी क्षेत्रातील संधी (Opportunities in the field of agriculture)

सध्या कृषी क्षेत्राला व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यासाठी कृषी या व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. कारण भविष्यात अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी कुशल शिक्षित व व्यावसायिक कृषी मनुष्यबळाची गरज भासणार आहे. कृषी क्षेत्रात पदवी संपादन करण्यासाठी शास्त्र शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी निम्नशिक्षण पदविका घेण्यासाठी दहावी नंतर डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत. कृषी शिक्षण घेतल्याने शेतीत आधुनिक पद्धतीचे प्रयोग करता येतात. कृषी पदवीधारकांना कृषी विद्यापीठांतर्गत शिक्षक, प्राध्यापक, व्याख्याता कृषी तंत्रनिकेतन यांसारख्या पदांवर काम करता येते. याशिवाय विविध सरकारी नोकरीत, बँका याठिकाणी कृषी अधिकारी हे पद असते. कृषी पदवीधर विविध उद्योग स्थापन करू शकतात किंवा विविध शेतीपूरक व्यवसाय सुरु करू शकतात.

उदा. कृषी पर्यटन – कृषी पर्यटन ही पर्यटनाची नवीन संकल्पना असून तिचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी पर्यटन हा एक फायद्याचा कृषिपूरक व्यवसाय आहे. कृषी पर्यटनामध्ये शेतात विविध पिंकाचे प्रयोग करता येतील. केंद्रावर येणाऱ्या पर्यटकांना यामुळे शेतीविषयक माहिती मिळेल. पर्यटनाच्या दिशा आता विस्तारू लागल्या आहेत. त्यामध्ये कृषी पर्यटन ही नव्याने उदयाला आलेली संकल्पना जोम धरू लागली आहे. कृषी पर्यटनाविषयी मार्ट, ॲग्रो टुरिझम विश्व यांसारख्या संस्था मार्गदर्शन करत आहेत. ॲग्रो टुरिझम विश्वसारख्या संस्थेमध्ये ज्या शेतकऱ्यांना पर्यटन केंद्र उभारायचं आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.

कृषी पर्यटन केंद्रात भात लागवडीचा अनुभव घेताना पर्यटक

 

कृषिपर्यटनातून कृषीशिक्षण (Agricultural education through agri-tourism)

कृषी आणि पर्यटन या दोन विभागांच्या समन्वयाने शेतकरी आपली आर्थिक प्रगती करू शकेल. कृषिर्यटनाला कृषिपूरक व्यवसाय म्हणून चालना देणे हे कृषिपर्यटनाचे उद्दिष्ट आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार प्राप्त होतो. कृषी केंद्रावर आलेल्या पर्यटकांचे नियोजन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, केंद्रावर स्वयंपाक बनवण्यासाठी, पर्यटकांना ग्रामीण खाद्य पदार्थांची माहिती देण्यासाठी, शेतीकामासाठी, माळीकाम, ट्रेकिंग, बोटिंग, शिवार फेरी, बाजार खरेदी, ऑनलाईन मार्केटिग, जाहिराती, व्यवस्थापनासाठी, शेतीच्या अवजारांची माहिती देण्यासाठी, हस्तकला, सण, उत्सव, जत्रा यांची माहिती देण्यासाठी कामगार लागतात. या कामामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल व या कामांच्या अनुभवामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल, ते अधिक प्रयोगशील बनतील.

शेतात नांगर हाकण्याचा अनुभव घेताना पर्यटक

कृषी पर्यटनामुळे ग्रामीण व शहरी भागातील दरी कमी होईल. शहरी लोकांना शेतीतील कष्टाविषयी कल्पना नसते त्यामुळे केंद्रचालकांनी शहरी लोकांना शेताविषयी माहिती द्यावी तसेच प्रत्यक्ष शेतात काम करण्याचा अनुभव द्यावा. यामुळे पर्यटकांच्या शेतीविषयक ज्ञानात भर पडेल आणि शेतात किती कष्ट करावे लागतात याची त्यांना जाणीव होईल.

https://agrotourismvishwa.com/marketing-and-planning-of-agro-tourism-center/

कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेतमालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन मिळते. कृषिपर्यटन केंद्रावर शेतातील किंवा परिसरातील ताजा माल फळे व भाजीपाला विक्रीस ठेवता येतो. यातून पर्यटकांना किफायतीशीर किमतीत ताजा शेतमाल मिळतो तर शेतकऱ्यालाही आर्थिक फायदा मिळतो. समजा गावातील एखादा शेतकरी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जर नवनवीन प्रयोग करत असेल तर परिसरातील इतर शेतकरीही त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकतात. अशाप्रकारे कृषिपर्यटनातून कृषिशिक्षणाला हातभार लागत आहे.

कृषी पर्यटन केंद्रात गावरान जेवणाचा आस्वाद घेताना पर्यटक

कृषीरंजन (Agritainment)

कामाचा ताणतणाव तसेच शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांना दोन दिवस निवांतपणे व शांत वातावरणात जाऊन राहण्याची संधी कृषिपर्यटनामुळे मिळते. कृषिपर्यटनामुळे कुटुंबासोबत निवांत क्षण घालवता येतात.

शहरी पर्यटकांना गावच्या जीवनाविषयी आकर्षण असते. कृषी पर्यटन केंद्रावर राहिल्यामुळे त्यांना ग्रामीण जीवन जगता येते. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना नव्याने गावचे जीवन व संस्कृती जाणून घेता येईल. काही जुन्या कला, परंपरा व वस्तू यांचे संवर्धन कृषी पर्यटनाच्या माध्यमातून करता येईल. त्याविषयी माहिती पर्यटकांना देता येईल.

कृषी पर्यटन केंद्रामध्ये शेतमालापासून उत्पादने बनवावीत, त्याची माहिती पर्यटकांना द्यावी. उदा. आवळा, आवळ्यापासून ज्यूस, सुपारी, मुरांबा यांसारख्या वस्तू बनवाव्यात.

 

केंद्रावर पर्यटकांना ग्रामीण खेळांविषयी माहिती दिली जाते व ते खेळ खेळण्यास देखील शिकवले जातात. उदा. हुतूतू , लगोरी, विटीदांडू

केंद्रचालक पर्यटकांसाठी विविध उपक्रम राबवतात उदा. त्यांना गाळापासून वस्तू बनवायला शिकवणे , मातीपासून मडके बनवायला शिकवण , चित्रकला , रंगकाम यांसारख्या गोष्टी उपलब्ध करून देतात. त्यांना बैलगाडी, ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्या माध्यमातून शिवारफेरी घडवली जाते. यातून पर्यटकांचे मनोरंजन होते.

https://agrotourismvishwa.com/conservation-promotion-of-rural-culture-through-agricultural-tourism-part-2/

पर्यटन केंद्राच्या आजूबाजूला काही पर्यटन ठिकाणांची सफर पर्यटकांना घडवली जाते. त्यांना गावातील जत्रा, उरूस यांसारख्या ठिकाणी फिरवले जाते. यातून पर्यटकांचे मनोरंजन होते.

केंद्रावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी केंद्रावर लेझीम, जागरण-गोंधळ, गारुड्याच्या खेळ, भजन, आदिवासी नृत्य, पोवाडा यांसारख्या ग्रामीण लोक व पारंपारिक कार्यक्रमाची व्यवस्था केली जाते.

कृषी पर्यटन केंद्रात शिवारफेरीचा आनंद घेताना पर्यटक

 

कृषीशिक्षण आणि कृषीरंजन या दोन कृषिपर्यटनाच्या बाजू आहेत यामार्फत कृषिपर्यटन केंद्राचा विकास होतो. यामुळे अप्रत्यक्षपणे गावच्या विकासालाही हातभार लागतो. तसेच शहरी वातावरणाला कंटाळलेल्या लोकांना क्षणभर विरंगुळाही मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × three =